grapes
grapes  
मुख्य बातम्या

पावसामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांची भीती

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेले काही दिवस खंड दिल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी पोषक  वातावरण तयार आहे. त्यामुळे द्राक्ष पट्ट्यात शुक्रवारी पाऊस पडल्यानंतर अनेक भागात प्रतिकूल वातावरण. सध्या द्राक्ष हंगामाच्या कामकाजाला गती येत असताना झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांची भीती निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील वर्षी मॉन्सूनोत्तर पावसासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. त्यातच पुढे मोठ्या कष्टातून पीक संरक्षणावर भरमसाठ खर्च झाल्यानंतर ऐन काढणीच्या हंगामात कोरोनामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यात गत महिन्यात सततच्या पावसामुळे हंगामाचे कामकाज पुढे जात असताना हा पाऊस अडचणींचा ठरणार असल्याचे चित्र आहे. चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामात अनेक शेतकऱ्यांकडे भांडवल नसताना शेतकरी पदरमोड करून, कर्ज घेऊन द्राक्ष बागा उभ्या करत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड, चांदवड, दिंडोरी व नाशिक तालुक्यांमध्ये द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. तर, सप्टेंबर अखेरीस बहार छाटण्या झालेल्या काही  बागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहेत. मात्र, हवामान प्रतिकूल असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या अडचणी उद्भवण्याची शक्यता

  • सध्याच्या स्थितीत पोंगा अवस्थेत असणाऱ्या बागा जिरण्याची भीती
  • फुलोरा असणाऱ्या बागांमध्ये गळकुज  
  • बागांच्या छाटण्या येणार नाहीत; मात्र काही ठिकाणी अपरिहार्यता
  • बागांवर डाऊनी, करपा रोगांची दाट शक्यता
  • प्रतिक्रिया बदलत्या हवामानामुळे नवीन छाटलेल्या बागांमध्ये नवीन तयार होणाऱ्या घडांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ होत आहे. -बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता.चांदवड

    पाऊस झाल्यास छाटण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मात्र पर्याय नसल्याने छाटण्या कराव्या लागतील. पांढऱ्या वाणात कमी मात्र रंगीत वाणात घड जिरण्याचे प्रमाण वाढू शकते. - रवींद्र बोराडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT