नवेखेड: कृष्णा काठावरील ऊस शेतीला हुमणीचा फटका बसला आहे.
नवेखेड: कृष्णा काठावरील ऊस शेतीला हुमणीचा फटका बसला आहे. 
मुख्य बातम्या

हुमणी, गोगलगायीच्या प्रादुर्भावाने कृष्णा नदीकाठची पिके धोक्यात

श्यामराव गावडे

नवेखेड, जि. सांगली : वाळवा तालुक्यात कृष्णा नदीकाठावरील शेतीत हुमणी आणि गोगलगायीचे संकट आल्याने शेकडो एकरवरील पिके उद्‍ध्वस्त होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय पातळीवर उपाययोजना करण्याची शेतकरी करत आहेत.   मागील पंधरवड्यात या भागात सलग पाऊस झाला. खरीप पिकांना हा पाऊस मानवणारा होता. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी भांगलणीच्या (निंदणी) कामांत गुंतला आहे. खरीप पिकांचे रोप, वेल सुकलेले नजरेस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पिकाच्या बुडतील माती खोदली असता हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. ही हुमणी सध्या हाताच्या अंगठ्याएवढी झाली आहे. लहान लावणं, वरंब्यावरील भुईमूग, आडसाली ऊस खोडवा या पिकांना हुमणीने लक्ष्य केले आहे. हुमणीच्या या हल्ल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आपापल्या परीने प्रतिबंधात्मक उपाययोउजना करीत आहे. शासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे. कृषी विभागाने याकडे डोळेझाक केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  हे कमी की काय म्हणून गोगलगायीचा हल्लाही खरीप पिकांवर झाला आहे. पिकांची कोवळी पाने व मुळ्या कुरतडल्या जात आहेत. यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हुमणीचा हल्ला होताना पिकाच्या मुळ्या कुरतडल्या जातात. उन्हाळ्यात सुप्तावस्तेत असलेली हुमणीची वाढ सध्या मोठी झाली आहे. फारणेवाडी बोरगाव येथील संदीप फारणे म्हणाले, की आमचे दोन एकर आडसाली उसाचे क्षेत्र हुमणीने बाधित झाले आहे. ऊस वाळला असून, भुईमुगाचे वेल सुकू लागले आहेत. नवेखेड येथील दीपक गावडे म्हणाले, की ३० गुंठे क्षेत्रांवर गलांडा फुलांची लागवड मागील आठवड्यात केली होती. ५० टक्के क्षेत्रावरील रोपे गोगल गतीने खाऊन टाकली आहेत. आम्ही गोगलगायीचे नियंत्रण करणारे रसायन वापरून हा हल्ला आटोक्यात आणला आहे. तरीही बाधित क्षेत्रामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT