शिवारातील हळदीवर आढळून आलेली प्रौढ कंदमाशी (दुसऱ्या छायाचित्रात) करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेले हळदीचे पीक. (तिसऱ्या छायाचित्रात) नांदेड जिल्ह्यातील हळद पिकातील कंदकूज.
शिवारातील हळदीवर आढळून आलेली प्रौढ कंदमाशी (दुसऱ्या छायाचित्रात) करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेले हळदीचे पीक. (तिसऱ्या छायाचित्रात) नांदेड जिल्ह्यातील हळद पिकातील कंदकूज. 
मुख्य बातम्या

हळद पिकावर कीड-रोगांचा हल्ला

टीम अॅग्रोवन

परभणी : सततच्या पावसामुळे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळद पिकावर हुमणी, कंदमाशी या किडींसोबतच पर्णकरपा, मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हळद उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार हे निश्चित आहे. हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा ओढा हळद पिकाकडे वाढला आहे. केळी, ऊस या पिकांना जास्त पाण्याची गरज असलेल्या त्यापेक्षा तुलनेने कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून या भागातील शेतकरी हळदची लागवड करत असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. हिंगोली हा प्रमुख हळद उत्पादक जिल्हा असून, यंदा या जिल्ह्यात २५ हजार ४९६ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ नांदेड, परभणी जिल्ह्यात हळद लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस झाला. सततचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे अनेक कीडी, बुरशीजन्य रोगांनी डोके वर काढले आहे.  साधारणतः १५ सप्टेंबरनंतर हळद पिकांवर कंदकूज, पर्णकरपा आढळून येतो. पर्णकरप्याचे लवकर येणारा तसेच उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. यंदा दोनही प्रकारचे पर्णकरपे एकाच वेळी आले आहेत. पर्णकरप्यामुळे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. मात्र कंदमाशीने हळद कंद पोखरल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंदकूज होते. कंदकूजमुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. अनेक भागांत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुप्त अवस्थेतील हुमणी किडीच्या वाढीसाठी पोषक वातारवरण मिळाल्यामुळे हळदीसह अन्य पिकांवरदेखील हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अनेक गावाशिवारांतील, औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा मंडळातील गोजेगाव, येळी, रुपूर, धार, साळणा या गावशिवारांतील, तसेच नांदेड जिल्ह्यातील हळदीवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. प्रतिक्रिया कंदकूजमुळे हळदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यंदा दोन्ही प्रकारचे करपे एकाचवेळी आढळून आले आहेत. कीड, रोगामुळे उत्पादनात घट येणार आहे. - डाॅ. के. टी. आपेट, वनस्पती विकृतिशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी.

परतीच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणावर धुके पडले. त्यामुळे हळदीवर करपा, खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नुकसान झाले आहे. कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाने हळद उत्पादकांना मार्गदर्शन करावे. - विश्वनाथराव नागरे, शेतकरी, गोजेगाव, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT