safflower
safflower 
मुख्य बातम्या

करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता 

टीम अॅग्रोवन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्‍पास भारत सरकारच्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान शास्‍त्र विभागाच्‍या मार्फत करडई संशोधनाकरिता नेटवर्क प्रकल्‍प येत्या पाच वर्षे कालावधीसाठी मंजूर झाला आहे, अशी माहिती करडई पैदासकार डॉ. एस.बी. घुगे यांनी दिली. 

हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था, नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय वनस्‍पती आनुवंशिक संशोधन ब्‍युरो, दिल्‍ली विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ या प्रमुख संस्‍था एकत्रितरीत्या या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. 

करडई या प्रमुख तेलबिया पिकाच्‍या संशोधनाकरिता विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या नेटवर्क प्रकल्‍पासाठी १९ कोटी ५९ लाख रुपये एवढे अनुदान मंजूर झाले आहे. यात परभणी येथील अखिल भारतीय सन्‍मवयीत करडई संशोधन प्रकल्‍पास ४८ लाख ६५ हजार रुपये एवढे अनुदान संशोधनासाठी प्राप्‍त होणार आहे. या प्रकल्‍पाचा मुख्‍य उद्देश करडई मधील सुधारणेसाठी जनुकीय विविधतेचा शोध (Exploring Genetic Diversity for improvement of safflower through genomic – assisted discovery of QTLs / Genes Associated with Agronomic Traits) हा आहे. यात कोरडवाहू क्षेत्रातील करडई पिकांच्‍या उत्‍पादन वाढ, बियांतील तेलाचे प्रमाण आणि गुणवत्‍ता वाढी यासाठी फिनोटाईप आणि अणू -रेणू संच तयार करणे आदी घटकांचा अंतर्भाव आहे.  तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढीचे उद्दिष्ट आहे. या संशोधन प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य संशोधक पदाची जबाबदारी करडई पैदासकार तथा संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.एस.बी. घुगे, साहाय्यक मुख्‍य संशोधक (करडई कृषी विद्यावेत्‍ता) प्रा. प्रितम भुतडा यांच्‍या कडे सोपवण्‍यात आली आहे. या प्रकल्‍पासाठी कुलगुरु डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालय यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले, असे घुगे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT