direct sell
direct sell  
मुख्य बातम्या

नगरमध्ये भाजीपाला विक्रीला बंदी 

टीम अॅग्रोवन

नगर ः कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नगर शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी भाजीपाल्याची विक्री करण्याला बंदी घातली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बाजारातही भाज्यांचे दर पडले असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

जिल्ह्यात दररोज चार हजार कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्यात नगर शहरातील आकडा आठशेच्या जवळपास आहे. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते आकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा, फळे-भाजीपाला विक्री करता येत होती. मात्र रुग्णसंख्या कमी होत नसल्याने सोमवारपासून (ता.३)) शहरात लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. दूध व आरोग्य सेवा वगळता सर्व बाबी बंद ठेवण्याचा महापालिका आयुक्तांनी आदेश काढला आहे. 

याशिवाय नगर शहरातील दादा पाटील शेळके बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव बंद होते. तरी शेतकरी रस्त्यावर भाजीपाला, फळांची विक्री करत होते. तेथील विक्री बंद करुन ती नेप्ती उपबाजारात नेली आहे. शहरात रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे विक्री करता येणार नसल्याने स्थानिक विक्रेते, शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. शहरात भाजीपाला, विक्री करता येणार नसल्याचे सांगत दरही पाडले आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी हतबल झाले आहेत.  कृषी विभागाचा समन्वय नाही  कडक लॉकडाऊन केला असला तरी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांची विक्री करता यावी यासाठी कृषी विभागाने समन्वय साधणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी असा समन्वय साधून अनेक शेतकरी, विक्रेत्यांना कडक लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागाने विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन दिली होती. यंदा मात्र फळे, भाजीपाला विक्रेत्यांना कृषी विभागाने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले आहे. यंदा भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT