कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र 
मुख्य बातम्या

कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र

टीम अॅग्रोवन

नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये कलाग्रामची निर्मिती करण्यात आली असून, त्याच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत कालाग्रामचे काम पूर्ण होणार असून, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक यांच्या वतीने विभागातील महिला स्वयंसाह्यता समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सव गोदाईचे उद्‍घाटन डोंगरे मैदान येथे रविवारी (ता. १६) झाले, त्या वेळी ते बोलत होते. नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्पाधिकारी उज्ज्वला बावके, उपायुक्त विकास मोरे, प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्रामची निर्मिती केली असून, शंभरहून अधिक महिलांना विक्री केंद्र कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प नाशिक येथे होत आहे. यातून नाशिकच्या उत्पादनांना देशभरात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे सांगितले.  या वेळी श्री. क्षीरसागर म्हणाले की, ग्रामीण भागातील बचत गट आणि संस्थांना या गोदाई प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना आदिवासी भागातील अनेक सेंद्रिय पदार्थ घेण्याची संधी मिळाली आहे. बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मालाला चांगले ग्राहक आणि मालाचे मार्केटिंग या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT