संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगरमधील १३६ छावणीचालकांना ४४ लाख रुपयांचा दंड

टीम अॅग्रोवन

नगर  : दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, छावण्यांमध्ये जनावरांना पुरेशी सुविधा न देणाऱ्या छावणीचालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्हाभरातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही अजून अनेक छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी येतच आहेत.

जिल्ह्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. या भागात शेती पूर्णतः तोटयात गेलेली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगावी, यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांमध्ये प्रशासकीय नियमानुसार सुविधा देणे गरजेचे आहे. यामध्ये छावणीचालक टाळाटाळ करतात. विशेषतः आठवड्यात तीन दिवस एक दिवसाआड पशुखाद्य देणे बंधनकारक असताना ते दिले जात नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी छावणी तपासणीसाठी ३२ पथकांची नियुक्ती केली. यात आत्तापर्यंत सुमारे १३६ जनावरांच्या छावण्यांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आले आहे.

अनेक छावण्यांमध्ये पशुखाद्य दिले जात नसल्याची बाब समोर आल्यानंतर तपासणी पथकाने संबंधित छावण्यांवर कारवाई करून आत्तापर्यंत ४४ लाख १५६० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांची हेळसांड सुरूच जनावरांच्या छावण्यांमध्ये पशुखाद्य व अन्य सुविधा दिल्या जात नसल्यामुळे प्रशासन कारवाई करत असले तरी अनेक ठिकाणी छावणीचालकांकडून शेतकऱ्यांची हेळसांड सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. प्रशासन सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असून, नंतर तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT