ॲग्रोवन यशोगाथांमधील मॉडेलचा होणार प्रसार
ॲग्रोवन यशोगाथांमधील मॉडेलचा होणार प्रसार 
मुख्य बातम्या

ॲग्रोवन यशोगाथांमधील मॉडेलचा होणार प्रसार

Vinod Ingole

नागपूर ः ॲग्रोवनमधील यशोगाथांची दखल घेत अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारातील प्रयोगांची चाचपणी करून अशी मॉडेल इतरांसमोर नेण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र ११ जिल्ह्यांत आहे. परंतू पुरेशा मनुष्यबळाअभावी कृषी विद्यापीठाच्या विस्तार कार्यास मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विस्तार कामात ‘ॲग्रोवन’ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित यशोगाथांमधील प्रयोगशील शेतकऱ्यांचे मॉडेल इतरांपर्यंत पोचविले जाणार आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये विदर्भातील ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रकाशित होतील, अशा शेतकऱ्यांच्या शेताला त्या भागातील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी भेटी देत संबंधित शेतकऱ्याने त्याच्या शेतावर राबविलेल्या प्रयोगांची माहिती घेतील. असे बांधावरील प्रयोग मग कृषी विद्यापीठ प्रक्षेत्र तसेच अन्य ठिकाणीही राबविण्यावर भर दिला जाणार आहे. अंजनगाव सूर्जी तालुक्‍यातील जवळा येथील रमेश मातकर यांची सेंद्रिय संत्रा उत्पादनाची यशोगाथा नुकतीच प्रकाशित झाली होती. दुष्काळी स्थितीतही मातकर यांनी दर्जेदार संत्रा उत्पादन घेतले. त्यांची यशकथा वाचल्यानंतर ही संकल्पना सुचल्याचे कुलगुरू डॉ. भाले यांनी सांगितले.  ॲग्रोवनमधील यशोगाथांची दखल घेत तज्ज्ञांना संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पाठविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतातील माती, पाणी व इतर घटकांचे पृथ्थकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्याआधारे जमिनीची एकंदरीत रचना लक्षात घेऊन अशा प्रकारे किफायतशीर शेतीचे मॉडेल अन्य शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  - डॉ. विलास भाले, कुलगुरू,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT