`Pay bill of grape growers on time`
`Pay bill of grape growers on time` 
मुख्य बातम्या

`द्राक्ष उत्पादकांची देयके वेळेवर अदा करा`

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादक नैसर्गिक आपत्ती, दरातील घसरण अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतो. वेळ, पैसा, श्रम खर्चून निर्यातदारांना माल देतो. मात्र काही निर्यातदार नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करतात. ही बाब शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना न्याय देण्यासाठी निर्यातदारांनी ठरल्याप्रमाणे वेळेवर देयके द्यावी, असा सूर दाभोळकर प्रयोग परिवारातर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चर्चासत्रात उमटला. 

या तीन दिवसीय चर्चासत्रास द्राक्ष बागायतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. परिवाराचे राज्य समन्वयक वासुदेव काठे यांनी आयोजन केले. या चर्चासत्रात द्राक्षबागेतील मणी क्रॅकिंग व फळमाशी नियंत्रणसंबंधी केलेल्या प्रयोगाची माहिती काठे यांनी दिली. कमी पाण्यात, खतात दर्जेदार द्राक्ष उत्पादनासंबंधीचा पंधरा वर्षाचा अनुभव नगर जिल्ह्यातील निघोज(ता.पारनेर) येथील राहुल रसाळ यांनी सांगितला. यावेळी त्यांना दाभोळकर प्रयोग परिवाराचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील सुनील डरे यांनी रासायनिक खताशिवाय दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी वापरत असलेल्या तंत्रासंबंधी माहिती दिली. 

शेतकऱ्यांनी मानले ‘ॲग्रोवन’चे आभार  

दैनिक ‘ॲग्रोवन’ने २० ते २३ जुलै दरम्यान ''द्राक्ष निर्यात ठरली मृगजळ'' ही मालिका चालवून शेतकऱ्यांच्या अडचणी, द्राक्ष निर्यात होऊन अडकलेले पैसे, याबाबत वास्तव समोर आणले. त्यामुळे अनेकांचे अडकलेले पैसे मिळाले. याबद्दल प्रयोग परिवाराचे गटप्रमुख किरण कावळे यांनी ''ॲग्रोवन''चे आभार मानले. यासह लॉकडाऊन काळात ज्या द्राक्ष निर्यातदारांनी निर्यातीतून कमी पैसे मिळालेले असतानाही शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिले, त्यांचेही आभार मानण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT