परभणी, हिंगोली, औरंगाबादमध्ये जिल्हा बँकेसाठी आज मतदान In Parbhani, Hingoli, Aurangabad Voting for District Bank today
परभणी, हिंगोली, औरंगाबादमध्ये जिल्हा बँकेसाठी आज मतदान In Parbhani, Hingoli, Aurangabad Voting for District Bank today 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली, औरंगाबादमध्ये जिल्हा बँकेसाठी आज मतदान

टीम अॅग्रोवन

परभणी/ औरंगाबाद :  दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४ केंद्रांवर आज, रविवारी (ता.२१)  सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवारी (ता.२३)  परभणी येथे होईल. औरंगाबाद जिल्हा बॅंकेसाठीही आज (ता. २१) मतदान होणार असून, २२ मार्चला होणार मतमोजणी होईल. 

परभणी, हिंगोली हे दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीत ७ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १४ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १ हजार ५७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मंगळवारी (ता.२३)  सकाळी आठ वाजता परभणी येथील कल्याण मंडळ येथे मतमोजणी होईल. 

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या १८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होत आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघातून अर्जच आला नाही. त्यामुळे २१ पैकी दोन जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. १८ जागांसाठीच ही निवडणूक होत आहे. एकूण ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १ हजार ११४ मतदार आपल्या मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. १० केंद्रांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदार मतदान करतील. सोमवारी (ता. २२) मतमोजणी होईल. कोरोनाच्या पाश्वभूमीवर  विशेष खबरदारी घोईन मतदानाची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT