नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवड आटोपली
नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवड आटोपली 
मुख्य बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवड आटोपली

टीम अॅग्रोवन

नंदुरबार : जिल्ह्यातील पपई लागवड जवळपास आटोपली असून, खानदेशात मिळून सुमारे पाच हजार हेक्‍टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. या हंगामात सर्वत्र मिळून ४०० ते ४५० हेक्‍टरने क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे.  नंदुरबारमधील नंदुरबार, तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा भागांत लागवड अधिक केली जाते. यातील पाणीटंचाई तापीकाठ वगळता सर्वत्र आहे. यामुळे जामनेर, पाचोरा, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार या भागांत लागवड कमी झाली आहे. तर चोपडा, यावल, रावेर, शिरपूर, शहादा, तळोदा भागात क्षेत्र स्थिर आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर असते. नंदुरबार व शहादामधील पूर्व भागात पाणीटंचाईचा फटका पिकाला बसला आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १८० हेक्‍टरने क्षेत्र कमी झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर व धुळे तालुक्‍यात दरवर्षी मिळून २०० ते ३५० हेक्‍टरवर लागवड असते. परंतु या भागातही लागवड सुमारे १०० हेक्‍टरने कमी झाल्याचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT