papaya season
papaya season  
मुख्य बातम्या

खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, अनेक शेतकरी कलिंगड, काकडी लागवडीसाठी बागा मोडत आहेत.  जशी उष्णता वाढते, तसा पपईचा हंगाम अंतिम स्थितीकडे पोचतो. कारण, उष्णतेमध्ये पपईची मागणी झपाट्याने कमी होते. सध्या पपईची मागणी उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, राजस्थानसह मुंबई, पुण्यातही कायम आहे. तसेच बागा मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहेत. कारण अतिपावसात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी तर डिसेंबरमध्येच बागा मोडून क्षेत्र रिकामे केले व त्यावर रब्बी पिकांची पेरणी उरकून घेतली.  सध्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार भागांत बागा बऱ्यापैकी आहेत. तर धुळ्यातील शिरपूर व जळगावमधील चोपडा, जामनेर व यावल भागांत पपईच्या बागा आहेत. या बागांचे उत्तम व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादनही साध्य केले आहे. दर्जेदार फळे तयार होत आहेत. त्यांना उचलही आहे. परंतु, बागांना एक वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्याने शेतकरी बागा मोडायला सुरुवात करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल भागांत काही शेतकऱ्यांनी बागा मोडायला सुरुवात केली आहे. यामुळे उत्पादन किंवा पपईची आवक पुढे आणखी कमी होईल. परिणामी, दर स्थिर आहेत.  शेतकऱ्यांना १६ रुपये दराची अपेक्षा नुकतीच पपईच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. आता शेतकरी १६ रुपये प्रतिकिलो दरांची अपेक्षा करीत आहेत. कारण सिंचन, रासायनिक खतांचा खर्च, गरज वाढू लागली आहे. उत्पादन खर्च लक्षात घेता दरवाढीची मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या धुळे व नंदुरबारात मिळून रोज १५ ट्रक (एक ट्रक १० मॅट्रिक टन क्षमता) पपईची आवक होत आहे. दिल्ली, राजस्थान भागातील व्यापारी एजंटच्या माध्यमातून खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT