पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढा
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढा 
मुख्य बातम्या

पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढा

टीम अॅग्रोवन

शहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने पपईला १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर देणे परवडत नसल्याचे कारण खरेदीदार व व्यापाऱ्यांनी पुढे केले आहे. यासंदर्भात खरेदीदारांच्या मागणीनुसार नुकतीच पपई उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात बैठक बोलावली. त्यात खरेदीदारांनी प्रतिकिलो ११.५५ रुपये प्रतिकिलो दर देऊ, अशी भूमिका घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी नकार दिल्याने ही बैठक अनिर्णित राहिली.  पपईचा दर  १४ रुपये ५५ पैसे असा ठरला होता. त्याच दराने शेतकऱ्यांनी पपईची जागेवर किंवा शिवार खरेदीत विक्री करावी यापेक्षा कमी दराने पपईची विक्री करू नये, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी वाढवलेला पपईचा दर व्यापाऱ्यांना मंजूर नाही. यामुळे व्यापारी, खरेदीदार एकजूट करून दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  यासंदर्भातील बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात घेण्यात आली. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. पपईला सध्या १४.५५ हा दर मिळत आहे. तो कमी करण्यासंदर्भात व्यापारी पुढे सरसावल्याने व्यापारी व संघर्ष समितीत दीर्घकाळ चर्चा चालली. पपई उत्पादक संघर्ष समितीने दर कमी होणार नाही, असे म्हटले आहे. पण, व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये दर घसरल्याने पूर्वीचा दर परवडत नसल्याचे सांगितले. बाजार समितीने व्यापाऱ्यांची समजूत घातली, परंतु व्यापाऱ्यांनी ११.५५ पैसे दर देऊ, अशी भूमिका कायम ठेवली. यामुळे बैठक निष्फळ ठरली.  खरेदीदार सुरुवातीपासून कमी दरांबाबत आग्रही आहेत. ते शेतकऱ्यांची कोंडी करीत आहेत. बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या हातात गेल्याने शेतकऱ्यांची मागणी खरेदीदार मान्यच करीत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक अनेक वर्षे सुरू आहे. ती बंद करावी, अशी मागणी पपई उत्पादक संघर्ष समितीने  केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT