Panan's cotton purchase stopped in Pusad
Panan's cotton purchase stopped in Pusad 
मुख्य बातम्या

पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंद

टीम अॅग्रोवन

आरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता. १५) पासून ‘पणन’ची शासकीय खरेदी बंद करण्यात आली आहे. शासकीय खरेदी बंद झाली असली तरी खासगीमध्येही जगदंबा ॲग्रो, वरुड व गिरीश ॲग्रो, शेलू या दोन्ही खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक नसल्याने जिन बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरुड येथील जगदंबा ॲग्रो येथे ‘पणन’ची शासकीय कापूस खरेदी बंद करण्यात आली. यामध्ये ४३ हजार ९३३.७१ क्विंटल कापूस घेण्यात आला.तर याच खरेदी केंद्रावर खासगीत केवळ ५००० हजार क्विंटल व शेलू येथील गिरीश ॲग्रो येथे २८००० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान कापसाचे दर वाढताच शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. आज रोजी खासगीत कापसाला ६००० हजार रुपयांवर प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने खेडा खरेदी करणारे खासगी व्यापारी जागेहून या भावात खरेदी करून कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नेऊन अधिक दरात कापूस विक्री करत आहे. याचाच परिणाम येथील खासगी कापूस खरेदी केंद्रावर झाला असून कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे.

आवक नसल्याने जिनिंग वरील मजुरवर्गाला कोणते काम लावावे, असा प्रश्न जिनिंग मालका समोर उभा राहिला आहे. तर यंदा कापसाच्या उत्पादनात घट येऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच व उर्वरित शेतकऱ्यांनी ‘पणन’ला कापूस विक्री केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे घरी कापूस नसल्याचे सांगितले जात आहे. तर दरवाढ होत असल्याने फरदड घेऊन कापूस घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

यंदा ‘पणन’ची खरेदी लवकरच आटोपली. यातच खरेदीही कमी झाली तर खासगीतही कापसाची आवक नसल्याने बाहेर जिल्ह्यातून बोलाविलेल्या कुशल कामगारांना बसून मजुरी द्यावी लागत आहे. यामुळेच खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खेडा खरेदी करणारा व्यापारी वर्ग बाहेर ठिकाणी कापूस विक्रीस नेत आहे. - आशिष चक्करवार, संचालक जगदंबा ॲग्रो, वरुड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT