पालघरमध्ये पंचरंगी, तर भंडारा-गोंदियात दुरंगी सामना
पालघरमध्ये पंचरंगी, तर भंडारा-गोंदियात दुरंगी सामना 
मुख्य बातम्या

पालघरमध्ये पंचरंगी, तर भंडारा-गोंदियात दुरंगी सामना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पंचरंगी, तर भंडारा-गोंदियामध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दामू शिंगाडा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर भंडारा गोंदियात भाजपचे हेमंत पटले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांची उमेदवारी कायम आहे. मतदान येत्या 28 मे रोजी होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देवराज बावनकर यांना अखेरपर्यंत "एबी फॉर्म8' मिळाला नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT