पाकिस्तानकडून आगळीक सुरुच; सीमेवर गोळीबार
पाकिस्तानकडून आगळीक सुरुच; सीमेवर गोळीबार 
मुख्य बातम्या

पाकिस्तानकडून आगळीक सुरुच; सीमेवर गोळीबार

वृत्तसेवा

श्रीनगर : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घूसन हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याकडून आगळीक सुरुच असून आज (गुरुवार) पहाटे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानी सैन्याने आज पहाटे पाच ते सहा असा एक तास गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेनेने पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT