करार
करार  
मुख्य बातम्या

कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणासाठी ‘पंदेकृवि’ आणि यूपीएलमध्ये करार

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या दोन हंगामात कापूस उत्पादकांची डोकेदुखी ठरलेली गुलाबी बोंड अळी तसेच मक्यावर आलेले नवीन अमेरिकन लष्करी अळीचे संकट थांबविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि यूपीएल कंपनी हे संयुक्तरीत्या काम करणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी (ता. चार) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व यूपीएलच्‍या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मागील हंगामात कृषी विद्यापीठ व यूपीएलने प्रायोगिक तत्त्वावर यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात दोन गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी संयुक्तरीत्या प्रकल्प  राबविला होता. याद्वारे सुमारे अडीचशेपेक्षा अधिक कापूस उत्पादकांना गुलाबी बोंड अळीवर मात देतानाच दुप्पट  उत्पन्न झाल्याची माहिती या कराराच्या वेळी देण्यात आली.  हे यश लक्षात घेता हा प्रकल्प याही खरीप हंगामात पुढे नेला जात आहे. सोबतच मक्यावरील अमेरिकन लष्करी  अळीला प्रतिबंध करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक स्वतंत्र प्रकल्प विद्यापीठ व यूपीएलच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.  कराराअंतर्गत यूपीएल तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविणार आहे. कराराच्या वेळी डॉ. भाले यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डाॅ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार  संचालक डॉ. डी. एम. मानकर, यूपीएलचे कॉर्पोरेट  अफेअर्स अँड इंडस्ट्री रिलेशन प्रमुख सागर कौशिक, इंडिया रिजनचे संचालक समीर टंडन, टेक्निकल ॲंड डेव्हलपमेंट ग्लोबल हेड डॉ. अजित कुमार, स्र्टॅटेजिक रिलेशन अँड स्पेशल प्रोग्राम विभागप्रमुख प्रताप रणखांब, कॉर्पोरेट कम्युनिकेटर कप्तान माळी, सचिन धर्मे, प्रशांत वाणी, समीर कुऱ्हाडे, प्रफुल सूर्या यांच्यासह विद्यापीठाचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. भाले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की या कराराअंतर्गत गेल्या वर्षात यवतमाळ जिल्ह्यात सायखेड व अकोला जिल्ह्यात कौलखेड जहाँगीर या दोन गावात गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठाचे तंत्रज्ञान यूपीएलच्या माध्यमातून या दोन गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आले. अळीवर संपूर्णपणे प्रतिबंध घालण्यात यश मिळाल्याचे सांगितले. यावर्षी अकोला जिल्ह्यात पाटखेड आणि यवतमाळ जिल्ह्यात बोधगव्हाण या दोन गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  तसेच मक्यावरील अळीसंदर्भात बुलडाणा जिल्ह्यात विद्यापीठ आणि यूपीएलच्या माध्यमातून काम करण्यात येईल, असे प्रताप रणखांब यांनी सांगितले. डॉ. मानकर यांनीही या कराराबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT