Oxford lessons for rural students 
मुख्य बातम्या

ग्रामीण विद्यार्थ्यांना ‘ऑक्स्फर्ड’चे धडे

‘‘ग्रामीण भागातील मुलांना जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेता यावा, यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ऑक्स्फर्ड विद्यापीठाचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

टीम अॅग्रोवन

बारामती : ‘‘ग्रामीण भागातील मुलांना जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेता यावा, यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ऑक्स्फर्ड विद्यापीठाचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने व मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने येत्या काही दिवसांत कृषिविषयक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्याचा औपचारिक प्रारंभ बुधवारी (ता. २३) शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत झाला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, ‘ऑक्सफर्ड’चे डॉ. अजित जावकर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त किरण गुजर यांच्यासह डॉ. शरदचंद्र लोहोकरे, डॉ. संजीव तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, ‘‘शेती अनेक अर्थाने बदलते आहे. पाण्याचा वापर, हवामानातील बदल, पिकांवर त्याचा होणारा परिणाम, या सारख्या बाबींमुळे शेती अडचणीत येऊ शकते. या पार्श्वभूमीवर संशोधन होणे व त्याला ऑक्स्फर्डसारखे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणे, ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.’’ 

डॉ. अजित जावकर यांनी या अभ्यासक्रमाची रचना व या संयुक्त प्रयत्नांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने गेल्या ५० वर्षांत जे काम केलेले आहे, ते पाहता मला ऑक्स्फर्डच्या लोकांना फार काही सांगावेच लागले नाही. ट्रस्टकडे शेतीशी संबंधित संशोधनापासून डेटापर्यंत सर्व बाबी आहेत. युद्धजन्य परिस्थिती पाहता युरोपियन देशांची अन्नसाखळी विस्कळीत होण्याची भीती आहे, अशा स्थितीत कृषिविषयक हा अभ्यासक्रम अधिक महत्त्वाचा ठरेल. मायक्रोसॉफ्टदेखील भविष्यात यात सहभागी होणार आहे. वातावरणातील बदल हा घटक आगामी काळात महत्त्वाचा ठरणार असून, याचा फायदा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होईल.’’

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘डॉ. अजित जावकर यांच्या सहकार्यामुळेच हा अभ्यासक्रम बारामतीत सुरू करणे शक्य झाले. ऑक्स्फर्डला कृषी क्षेत्रात काम करण्यात रस आहे, हे समजल्यावर बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टशी मी त्यांचे बोलणे करून दिले व सहा महिन्यांत अभ्यासक्रम सुरू करण्यापर्यंत प्रवास आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अधिक व्हावा, असा यात प्रयत्न आहे. ज्या संस्था आपण चालवतो, त्याचा समाजाला फायदा काय, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी संधी देऊन त्याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करून घेण्याचे आमचे धोरण आहे.’’ नीलेश नलावडे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. जया तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रामीण भागासह महाराष्ट्रातील मुलांना कृषिविषयक अत्याधुनिक ज्ञान व जोडीला ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळेल, ही बाब विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरेल. - शरद पवार, ज्येष्ठ नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर, बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT