Akola papaya
Akola papaya  
मुख्य बातम्या

वाशीम, बुलडाण्यात आठ हजार हेक्टरवर नुकसान 

टीम अॅग्रोवन

अकोला : वऱ्हाडात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात सुमारे आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला तडाखा बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अहवालात हा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. अकोला जिल्ह्यातही नुकसान झाले असून, या बाबतची आकडेवारी मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. 

वाशीममध्ये ४,८८० हेक्टरचे नुकसान  वाशीम जिल्ह्यात १९ मार्चला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा तालुक्यात ४,८८० हेक्टरचे नुकसान झाले आहे. वाशीम तालुक्यात वाशीम, कोडाळा, झामरे, नागठाणा, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, अनसिंग या भागात कांदा, कडधान्य, भाजीपाला पिकांचे १,६९३ हेक्टरवर नुकसान झाले आहे. याचा २,१२३ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. मालेगाव तालुक्यात किन्हीराजा, मुंगळा, करंजी, चांडस, शिरपूर या गावात गहू, हरभरा, मूग, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेवगा, पपई, सोयाबीन या पिकांचे १,८०० शेतकऱ्यांचे १,१३२ हेक्टरचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यात केनवड, गोवर्धन भागात कांदा, पपई, उन्हाळी मूग, भाजीपाला पिकाचे १,८१३ शेतकऱ्यांचे १,४७६ हेक्टरवर नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. मंगरूळपीर तालुक्यात आसेगावमध्ये ४६ हेक्टर, मानोरामध्ये इंजोरी, कुपटा, शेंदुर्जना, गिरोली, मानोरा, उमरी बुद्रूक भागात ५३१ वरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ६,६९७ शेतकऱ्यांचे ४,८८० हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

मेहकर तालुक्यात सर्वाधिक नुकसान  १९ मार्चला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ४,४३३ शेतकऱ्यांचे २,८११ हेक्टरवर नुकसान झाले. चिखली, मोताळा, मलकापूर, नांदुरा, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यात नुकसान झाल्याचा अहवाल कृषी यंत्रणांनी तयार केला आहे. यात प्रामुख्याने मेहकर तालुक्यात सर्वाधिक १,१५९ हेक्टरचे नुकसान आहे. या नंतर देऊळगावराजामध्ये ७९२, सिंदखेडराजात १५८ तर नांदुरामध्ये १०२ हेक्टरवरील नुकसानीचा समावेश आहे. या जिल्ह्यात कांदा, टरबूज, टोमॅटो, गहू, लिंबू, हरभरा, मूग, भुईमूग, फळपिके, भाजीपाल्याचा समावेश आहे. वीज पडून मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर डोणगाव परिसरात १२ घरांची पडझड झाली असून, या दरम्यान डोक्यात दगड पडून एकजण जखमी झाला आहे. डोणगाव परिसरात या आपत्तीमुळे शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता.२०) दुपारनंतरही जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, मोताळा, शेगाव, तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT