Order to take cotton in two vehicles, demanded by the farmers at Manavat
Order to take cotton in two vehicles, demanded by the farmers at Manavat 
मुख्य बातम्या

दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या, मानवत येथील शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत येथील केंद्रावरील कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन वाहनामध्ये भरुन आणलेला कापूस स्विकारण्याचे आदेश केंद्र प्रमुखांस द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ऑनलाइन लिंकव्दारे नोंदणी केली आहे. परंतु, मानवत येथील ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर केंद्र प्रमुखाच्या मनमानीमुळे खरेदीची गती अतिशय संथ आहे. एका शेतकऱ्याचा कापूस दुसऱ्यांदा खरेदी केला जात नाही.

काडी कचरा, पिवळा पडलेला आदी कारणे सांगत शेतकऱ्यांचा कापूस नाकारले जात आहे. एका शेतकऱ्याचा ४० क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. एका वाहनात ४० क्विंटल कापूस आणणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. एक शेतकरी एक वाहन अशी सक्ती करण्यात आली आहे. 

व्यापाऱ्यांशी संगणत करुन शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करण्यासाठी गती वाढवावी लागेल. त्यासाठी पणन महासंघाअंतर्गत पाथरी बाजार समिती अंतर्गत मानवत येथील जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरु करावी, अशी मागणी अमृतराव शिंदे, राजाभाऊ काकडे, गणेश सुर्यवंशी, मोहन मानोलीकर, बाबासाहेब आवचार, सुनिल कदम यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT