nagpur orange
nagpur orange  
मुख्य बातम्या

शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक

टीम अॅग्रोवन

अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या चौसाळा गावातील शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन'च्या वृत्तानंतर राज्यभरातून बळ मिळाले. तब्बल २२ गावातील शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे संघ स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात सहा गावांमध्ये अशा संघाची बांधणी होणार आहे.  अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा परिसरात संत्रा लागवड अधिक आहे उत्पादित संत्र्याची आपल्या अटींवर खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी जाहीर केला होता. याला गावातील युवा शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता चौसाळा संत्रा उत्पादक संघाची बांधणी करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून संत्रा उत्पादकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याकरिता चौसाळा सुरक्षा समितीचे ही गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या अटीवर संत्रा विकला जाईल अशी भूमिका जाहीर केली.  ‘ॲग्रोवन''ने मंगळवारी (ता.२७) वृत्त प्रकाशित केले होते. व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे राज्यभरातून अनेकांनी समर्थन केले. तब्बल २२ गावातील शेतकऱ्यांनी आमच्या गावात अशा प्रकारचे संघ उभारणार असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांच्या शोषणाविरोधातील या मोहिमेत चौसाळा गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा देखील या २२ गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भंडारज, दहीगाव, चिंचोना, निमखेड बाजार, खिराळा या गावांमध्ये संत्रा उत्पादक संघाची बांधणी केली जाणार आहे.  गाव पातळीवरील या संघापासून पुढे महासंघाची देखील निर्मिती केली जाणार असल्याची माहिती हर्षद काळमेघ यांनी दिली. त्याकरिता संस्था नोंदणी कार्यालयात रीतसर नोंदणीही केली जाणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या महासंघामध्ये संत्रा उत्पादक प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येईल, असेही हर्षद काळमेघ यांनी सांगितले. निमखेड बाजार आणि दहिगाव चे येथे त्याकरिता पहिल्या टप्प्यात बैठक पार पडली.

प्रतिक्रिया गाव पातळीवर होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोषणाविरोधात आम्ही दंड थोपटले. या मोहिमेला राज्यव्यापी ओळख आणि बळ ‘ॲग्रोवन’ने दिले. त्यामुळे यापुढील काळात संत्रा उत्पादकांचा महासंघ स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.  - हर्षद काळमेघ, सदस्य, संत्रा उत्पादक सुरक्षा समिती, चौसाळा, अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT