संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी चर्चा करणार Orange import duty case Will discuss with Bangladesh
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी चर्चा करणार Orange import duty case Will discuss with Bangladesh 
मुख्य बातम्या

संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी चर्चा करणार

टीम अॅग्रोवन

अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संत्रा निर्यात प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भाने गेल्या दोन दिवसांपूर्वीच खासदार रामदास तडस यांना निवेदन देत केंद्र सरकारने हस्तक्षेपाची मागणी या प्रकरणी केली होती. अमरावती जिल्ह्यात सुमारे दीड लाख मेट्रिक टन संत्रा उत्पादन होते. यापैकी सर्वाधिक ७८ हजार मेट्रिक टन संत्रा निर्यात एकट्या बांगलादेशला केली जाते. मात्र बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे संत्रा निर्यातदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आयात शुल्क वाढीचा फटका शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. देशांतर्गतच संत्रा प्रक्रिया विक्री करावी लागेल. त्यामुळे दर पडतील, अशी भीती आहे. परिणामी केंद्र सरकारने या संदर्भाने मध्यस्थी करून बांगलादेशला आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. बांगलादेश सरकारशी या संदर्भात चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीचा केंद्र सरकार सहानुभूतिपूर्वक विचार करणार असून, बांगलादेश सरकारशी या संदर्भाने चर्चा केली करून परस्पर सहकार्यातून हा प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT