कर्जमाफीवरून विधिमंडळ ठप्प
कर्जमाफीवरून विधिमंडळ ठप्प  
मुख्य बातम्या

कर्जमाफीवरून विधिमंडळ ठप्प

टीम अॅग्रोवन

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १२) विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मंगळवारी दिवसाच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले. गली गली में शोर है, सरकार चोर है, “शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक सभागृहातही आक्रमक राहिले. विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. परिणामी सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा तहकूब झाले. गदारोळ सुरूच राहिल्याने बाराच्या सुमाराला कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. या गदारोळात सरकारने काही शासकीय कामकाज उरकून घेतले. तिकडे विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीसह शेतीच्या इतर प्रश्नांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधक आक्रमक पवित्र्यात होते. विरोधीपक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या गदारोळातच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचे कामकाज लोकशाही मार्गाने चालले पाहिजे असे सांगत कामकाज सुरू करण्याचे आवाहन सभापतींना केले. मात्र, गदारोळामुळे कामकाज पहिल्यांदा एक वाजेपर्यंत दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या कर्जमाफीच्या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या २०१७-१८ च्या २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्रे सभागृहासमोर मांडण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT