केळी
केळी  
मुख्य बातम्या

परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी करावी

टीम अॅग्रोवन

जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४ जानेवारीपासून नवती केळीचे दर रोज जाहीर करणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात फक्त परवानाधारक व्यापारीच केळीची खरेदी करू शकतील. जे दर जाहीर होतील, त्याच दरात खरेदी बंधनकारक राहील, फक्त मागणी अत्यल्प असली तरच जाहीर दरापेक्षा १०० रुपये कमी दरात व्यापारी खरेदी करू शकतील, असे निर्णय चोपडा बाजार समितीचे पदाधिकारी, शेतकरी व व्यापारी आदींनी एका बैठकीत नुकतेच घेतले आहेत.  बाजार समितीच्या सभागृहात यासंबंधीची बैठक झाली. सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक अरुण पाटील, धनंजय पाटील, रामलाल कंखरे, नितीन पाटील, मगन बाविस्कर, सचिव एम. बी. महाजन, शेतकरी ॲड. रवींद्र निकम, ॲड. हेमचंद्र पाटील, भागवत महाजन, सुनील पाटील, संदीप महाजन, अजित पाटील, व्यापारी संजय शर्मा, राजीव पाटील, वसंत पवार, फरीद बागवान, हाजी हारून, हाजी सत्तार, असलम खान आदी उपस्थित होते.  केळी दरांबाबतचे राजकारण दूर करा. जानेवारी, फेब्रुवारीत केळीला मागणी असते; परंतु याच महिन्यात चोपडा बाजार समितीचे केळीचे स्वतंत्र दर नसतात. रावेरात केळी दरांबाबत राजकारण सुरू आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला. चोपडा बाजार समिती नवती केळीचे दर जाहीर करीत नाही. रावेर बाजार समिती जे दर जाहीर करते, त्यानुसार चोपड्यात खरेदी केली जाते का? शेतकऱ्यांची दर्जेदार केळीदेखील जाहीर दरांच्या तुलनेत कमी दरात खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांची मिलीभगत असते, असा आरोप सभापती पाटील यांनी केला. व्यापारी मनमानी करीत असल्याने बाजार समितीला बैठका घ्याव्या लागत आहेत. जे दर जाहीर होतात, त्यानुसार खरेदी व्यापारी करीत नाहीत. जे नियम ठरतात, त्यातही पळवाटा काढतात, असा संताप शेतकरी ॲड. रवींद्र निकम यांनी व्यक्त केला.  केळी खरेदीनंतर जे धनादेश शेतकऱ्यांना व्यापारी देतात, त्यासंदर्भातही शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची हमी राहील, संरक्षण राहील. यासंदर्भात बाजार समिती हस्तक्षेप करून गडबड झाली तर कारवाई करील. तसेच केळी वाहतुकीचे जे मजुरी दर ठरतील, त्याबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला. या हंगामात जानेवारी महिना संपून मार्च सुरू झाल्याने आता मार्चपासून नवती केळीचे दर जाहीर होतील, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT