हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक कर्जवाटप
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक कर्जवाटप 
मुख्य बातम्या

हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा खरीप पीक कर्जवाटपात हात आखडता आहे. आजवर जिल्ह्यातील २८ हजार ९१८ शेतकऱ्यांना १३५ कोटी ८ लाख ७ हजार ५४० रुपये (११.६३ टक्के) पीककर्जाचे वाटप करण्यात आले. सर्वच बॅंकांची पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर पर्यंत पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती होणे शक्य दिसत नाही.

यंदा (२०१९-२०) च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार १६१ कोटी ९६ लाख ७७ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना सर्वाधिक ८५३ कोटी ९६ लाख ७७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४८ कोटी रुपये उद्दिष्टाचा समावेश होता. 

आजवर राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ५ हजार २९१ शेतकऱ्यांना ५७ कोटी ३३ लाख ११ हजार रुपये (६.७१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३ हजार ४६६ शेतकऱ्यांना २४ कोटी १० लाख ९८ हजार रुपये (१५.०७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २० हजार १६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ६४ लाख ४५ हजार रुपये (३६.२५ टक्के) पीक कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच बॅंकांच्या पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे. त्यामुळे खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.

बॅंकनिहाय पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपयांमध्ये)
बॅंक उद्दिष्ट शेतकरी संख्या वाटप रक्कम टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बॅंका ८५३.९६ ५२९१ ५७.३३११ ६.७१
म.ग्रा.बॅंक १६०.० ३४६६ २४.१०९८ १५.०७
जिल्हा बॅंक १४८.०० २०१६१ ५३.६४४५ ३६.२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT