Only auction permission is allowed in Nashik Market Committee
Only auction permission is allowed in Nashik Market Committee 
मुख्य बातम्या

नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला परवानगी

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, आडते व हमाल, मापारी आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर बाजार समितीने खबरदारीची उपाययोजना म्हणून किरकोळ शेतमाल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री होणार आहे. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य आवार व पेठ रोड येथील शरदचंद्र पवार फळ बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलाव होणार असून किरकोळ विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इतर घटकांना या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे. बाजार समिती आवारात कोणीही कोणत्याही प्रकारे किरकोळ विक्री करणार नाहीत. जर असा प्रकार बाजार समितीच्या आवारात घडल्यास व्यापारी अथवा संबंधितांवर संचारबंदी सुरू असल्याने कलम १४४ अन्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात येईल, असा आदेश बाजार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सचिव अरुण काळे यांनी काढला आहे. 

शेतकऱ्यांना किरकोळ विक्री करावयाची असल्यास त्यांनी फळे व भाजीपाला नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरात ४३ ठिकाणी निश्चित केलेल्या बाजारात विक्री करावयाची आहे. 

या आहेत सूचना

  • केवळ लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री होणार
  • किरकोळ विक्री पूर्णपणे बंद
  • आवारात मोटरसायकल, सायकल व खासगी वाहनास प्रवेशास मनाई 
  • शेतमालाच्या वाहनसोबत चालक व एकाच शेतकऱ्यास प्रवेश 
  • सोशल डिस्टन्ससाठी नेमून दिलेल्या जागेवर अंतर ठेवून व्यवहार करावे
  • परवानाधारक व्यापाऱ्यांना लिलावप्रक्रियेत परवानगी, विना परवाना धारकांना परवानगी नाही  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

    Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

    Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

    Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

    SCROLL FOR NEXT