वीज
वीज 
मुख्य बातम्या

सोलापुरात शेतीपंपाला दिवसा सहा तासच वीज

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आधीच शेतकरी अडचणीत आला असताना, आता महावितरणने दिवसा शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे भारनियमन आणखी दोन तासांनी वाढवले आहे. त्यामुळे आठ तास मिळणारी वीज आता केवळ सहा तास मिळणार आहे. दुष्काळाच्या सध्याच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने जणू दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आणून ठेवली आहे. महावितरणच्या वतीने शेतीसाठी दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने दिवसाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांनी कपात करत भारनियमन वाढवले आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा केवळ सहा तासच वीज मिळत आहे. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जेमतेम पाणी आहे. त्यातच आता महावितरणने भारनियमन वाढविल्यामुळे आहे, ते पाणी तरी पिकांना द्यायचे की नाही? असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. महावितरण शेतीपंपासाठी रात्रीच्या वेळेला दहा तास वीजपुरवठा करते. मात्र, रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल नाही. दिवसा असलेल्या वीजपुरवठ्याच्या कालावधीत शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करतात. मात्र, आता दिवसाच्या कालावधीत महावितरणने वीजपुरवठ्यात घट केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा बाजारात सध्या कोणत्याही पिकांना बाजारभाव नाही. कवडीमोल किमतीने भाजीपाला शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. भाजीपाला घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता महावितरणने वाढीव भारनियमन सुरू केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT