oilseeds
oilseeds  
मुख्य बातम्या

देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मिती

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २०१९-२० (एप्रिल ते मार्च) मध्ये १५० तेलबिया हब उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणे वाणांची पैदास करण्याचे काम या हबमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, आतापर्यंत उद्दिष्टापैकी केवळ ३५ तेलबिया हबची उभारणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशात तेलबिया उत्पादनात मागणीच्या तुलनेत तूट आहे. त्यामुळे भारत हा जगात सर्वाधिक तेलबिया आयात करणारा देश आहे. २०१८-१९ मध्ये देशात १५० लाख टन खाद्यतेल आयात झाली आहे. या आयात खाद्यतेलाचे मूल्य साडेसात हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे खाद्यतेलावरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने उच्च उत्पादन देण्यारे बियाणे आणि इतर शेतीयोग्य निविष्ठा पुरवठा करण्यासाठी १५० तेलबिया हब उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.  ‘‘देशात तेलबिया उत्पादन वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी पूर आणि कीड-रोगप्रतिकारक वाण उत्पादनासाठी अधिकाधीक बियाणे हबची आवश्‍यकता आहे. कडधान्य बियाणे हबचे स्थापना करण्याचे काम सतत सुरू असावे. तेलबिया बियाणे हब हे कृषी विज्ञान केंद्र आणि भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या केंद्रांमध्ये उभारण्यात येत आहे, ’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एक कोटी लिटर खाद्यतेल उत्पादन  देशात २०१७०१८ मध्ये तेलबियांचे ३१५ लाख टन उत्पादन झाले होते. तर, २०१८-१९ मध्ये ३२३ लाख टन उत्पादन झाले होते. २०१९-२० च्या खरीप हंगामात २२४ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागील वर्षी खरिपात २१३ लाख टन तेलबिया उत्पादन झाले होते. देशातील एकूण तेलबिया उत्पादनातून केवळ एक कोटी लिटर खाद्यतेल उत्पादन होते. तर, देशाची गरज २.५ ते २.६ कोटी लिटरची आहे. उर्वरित १.५ कोटी लिटर आयात केले जाते आणि त्यावर जवळपास साडेसात हजार कोटी खर्च होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT