पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणी
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणी 
मुख्य बातम्या

पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

पुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्याचा फटका रब्बी पेरण्यांना बसला आहे. पुणे विभागात रब्बी हंगामातील एकूण १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९ हजार ९०८ हेक्टर म्हणजेच ३४ टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालकांच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कमी कालावधीची आणि कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहू अशा पिकांऐवजी हरभरा व भाजीपाला, चारा पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यंदा नगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील जिरायत ज्वारी पिके करपू लागली असून, उत्पादनामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. ज्वारी बागायत क्षेत्र अत्यल्प असून, पिके पोटरीच्या अवस्थेत आहे. काही भागात पाण्याची कमतरता भासू लागल्याने उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे. 

हलक्या जमिनीतील हरभरा पीक सुकू लागले असून, भारी जमिनीतील हरभरा पिकाची अवस्था बरी आहे, मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच कांदा पीकदेखील वाढीच्या अवस्थेत आहे. लाभक्षेत्रातील व नदीकाठच्या क्षेत्रावर गहू व हरभरा ही पिके घेतली जात असून, पेरणी अद्यापही चालू आहे. कमी पर्जन्यमान, पर्जन्यमानातील मोठा खंड व जमिनीतील ओलाव्याअभावी जिरायत क्षेत्रावरील पेरणी झालेल्या ज्वारी, मका, हरभरा पिकांची वाढ खुटलेली असून पिके सुकून गेलेली आहेत. 

उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या धान्य व चारा उत्पादन सरासरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पेरणी झालेले ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून, पावसाअभावी पिकाची वाढ खुंटलेली आहे. गहू व हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे विभागात रब्बीची झालेली पेरणी, हेक्टरमध्ये
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्के 
नगर ६, ६७, २६१ २, ३९, ४५८ ३६
पुणे ३, ९१, ८९७ ९९ , ४३९ २५
सोलापूर ७, २१, ८७७ २, ७१, ०२१ ३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT