sowing
sowing  
मुख्य बातम्या

वर्धा जिल्ह्यात रब्बीत २८ टक्‍के कर्ज वितरण

टीम अॅग्रोवन

वर्धा ः खरिपासह रब्बी हंगामातही कर्जवाटपात बॅंकांची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने जमिनीत ओलावा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे रब्बी क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे संकेत असताना कर्ज वाटप मात्र अवघे २८ टक्‍केच झाले आहे.  खरिपासाठी जिल्ह्यातील बॅंकांना ८८२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ३३२ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप बॅंकांकडून करण्यात आले. खरीप हंगामात वेळोवेळी शासन, प्रशासन स्तरावरून कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी बॅंकांना निर्देश देण्यात आले. परंतु, त्याचा काही एक परिणाम बॅंकांवर झाला नाही. परिणामी खरीप हंगामात बॅंका कर्ज वितरणात पिछाडल्या. या वर्षी मॉन्सूनोत्तर पावसामुळे सिंचन प्रकल्पाची पातळी चांगली आहे. नद्या, नाल्यांनादेखील पाणी आहे. सोबतच जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगाम क्षेत्र दुपटीने वाढण्याचे संकेत आहेत.  अशा स्थितीत कर्ज वितरणाची गती वाढणे अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ २८ टक्‍केच कर्जवाटप होऊ शकले. रब्बी हंगामासाठी ९८ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. आजवर केवळ २८ कोटी रुपयांचेच कर्जवाटप बॅंकांनी केले आहे. कर्जाचे नूतनीकरण न करणे, शिवाय अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने असलेली नापिकी, यामुळे कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता आली नाही. यामुळे शेतकऱ्यांनीदेखील बॅंकांकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जाते. खासगी व्यक्‍तींकडून उसनवारी करूनच रब्बी हंगामात निविष्ठांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.  बॅंकांची उदासीनता चव्हाट्यावर जिल्ह्यात खरिपात ४ लाख ५ हजार ६२८ हेक्‍टर पेरा होता. रब्बीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्‍टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बॅंकांकडून रब्बीचेही नियोजन केले जाते. परंतु, रब्बी हंगामात बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याची वस्तुस्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT