raisin
raisin 
मुख्य बातम्या

सांगली: ऑनलाइन बेदाणा सौदे लवकरच सुरु 

टीम अॅग्रोवन

सांगली: हळदीपाठोपाठ बेदाण्याचेही ऑनलाइन सौदे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत प्राथमिक बैठक घेवून चर्चा करण्यात आली. बुधवारी (ता. ६) बेदाण्याचे सौदे सुरू करण्याबाबत बाजार समिती व्यापारी जिल्हा उपनिबंधक यांच्यात बैठक घेणार आहे. पुढील आठवड्यात बेदाण्याचे ऑनलाईन सौदे सुरू होण्याची शक्यता असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.  बाजार समितीमध्ये ऑनलाइन बेदाणा सौदे काढण्याबाबत प्रशासन आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, बेदाणा व्यापारी राजेंद्र कुंभार, शितल पाटील, सुशिल हडदरे आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डातील सौदे महिनाभर बंद होते. सौदे बंद राहील्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम होत होता. शिवाय शेतकऱ्यांसमोरही अडचणी निर्माण झाल्या होत्या. हळद व बेदाण्याची विक्री थांबली होती. सौदे लवकर सुरू झाले नाहीत, तर अडचणी वाढणार होत्या. एकाच वेळी मोठी आवक झाली तर मालाचे हळद व बेदाण्याचे दर पडण्याची भिती होती. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ऑनलाइन सौदे सुरू करण्याचे आदेश दिले. मागील आठवड्यात मार्केट यार्डात हळदीचे ऑनलाइन सौदे सुरू करण्यात आले आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बेदाण्याचे ऑनलाईन सौदे काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

त्यामध्ये संभाव्य अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. बुधवारी बाजार समितीत याबाबत सविस्तर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अडचणी कोणत्या आहेत, कोणत्या अडचणी येऊ शकतात यावर चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन बेदाणे सौदे सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली जाईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून पुढील आठवड्यात बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT