कांद्याने लुटले अन्‌ कपाशीने गुंडाळले
कांद्याने लुटले अन्‌ कपाशीने गुंडाळले 
मुख्य बातम्या

कांद्याने लुटले अन्‌ कपाशीने गुंडाळले

टीम अॅग्रोवन

झोडगे, जि. नाशिक : माळमाथा परिसरात कांदा व कपाशीचे प्रमुख पीक घेतले जाते. येथील अवर्षणग्रस्त भागात कांदा पिकाला दोन-चार वर्षांत एकदा उच्चांकी भाव मिळतो. इतर वेळेस मात्र मातीमोल दराने कांदा विकावा लागतो. कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या पिकाने शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कपाशी संकटात आहे. त्याला भाव नसल्याने दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेला बळीराजा ‘कांद्याने लुटले अन्‌ कपाशीने गुंडाळले’ अशी भावना व्यक्त करीत आहे.

गेल्या वर्षी बोंडअळीने, तर यंदा दुष्काळी परिस्थितीने कपाशीला घेरले. अपुऱ्या पावसामुळे पांढरे सोने शेतात फुललेच नाही. विहिरीच्या पाण्यावर जगविलेल्या कपाशीला बाजारभाव नाही. अल्प पावसाने वजन नसल्याने मोठ्या आशेने काळ्या मातीत निसर्गाच्या भरवशावर बी-बियाणे, खत फवारणी, मशागतीचा खर्च वाया गेला आहे. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणजे विविध कार्यकारी सहकारी संस्था व जिल्हा बॅंकही आर्थिक संकटात सापडली आहे.

खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदींसह खरेदीची भिस्त कृषी सेवा केंद्रावरच होती. हंगामावर परतफेडीच्या बोलीवर कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांना मालाचा पुरवठा केला. कमी दरामुळे अनेक कृषी सेवा केंद्रांकडे शेतकऱ्यांची पावले वळत नाहीत. केंद्रांच्या संचालकांना वसुलीसाठी खेड्यापाड्यात जावे लागत आहे. रब्बी हंगामाच्या आशा दुष्काळामुळे संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व कृषी व्यावसायिक अडचणीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT