Onion seedlings flourish in Satara district
Onion seedlings flourish in Satara district 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात कांदा रोपे तेजीत

टीम अॅग्रोवन

सातारा ः मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याचे दर शेतकऱ्यांना दिलासा देणारे मिळत असल्याने कांदा लागवडीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाढला आहे. यामुळे कांदा रोपाची मागणी वाढल्याने रोपाचे दर तेजीत आले आहे. पूर्वी वाफ्यावर होणारी रोपांची विक्री आता फुटावर केली जात आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता कांद्याची लागवड केली जाते. रब्बीत माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यातील होणारी लागवड आता पश्चिमेकडील सातारा, कऱ्हाड, वाई, जावली, पाटण तालुक्यातही क्षेत्रात वाढ झाली आहे. पश्चिमेकडील तालुक्यात उसात आंतरपीक म्हणून लागवड करण्याचा कल वाढला आहे.

कांद्याच्या रोपाची ते बियाण्याची मागणी वाढली आहे. साधारणपणे कांद्याची तीन ते चार हजार रुपये किलो बियाण्याचे दर गेले आहेत. सध्या रोपाची लागण वेगाने सुरू झाली आहे. पूर्वी वाफ्यावर कांद्याची रोपाची विक्री केली जात होती. मात्र, आता कांद्याचे दर तेजीत असल्याने रोपांची विक्री फुटावर केली जात आहे. यामुळे एक एकर क्षेत्रासाठी रोपांना कमीत कमी १८ ते २० हजार रुपये खर्च येत आहे.

यामुळे भांडवली खर्चात दुप्पटीपेक्षा जास्त खर्च येत आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांपासून कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत गेली आहे. नऊ ते दहा हजार क्षेत्रावर होणारी कांदा लागवड या हंगामात सुमारे १२ ते १३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT