Onion rates in Lonanda Bazar Committee 11 thousand per quintal
Onion rates in Lonanda Bazar Committee 11 thousand per quintal 
मुख्य बातम्या

लोणंद बाजार समितीत कांद्याला ११ हजारांचा दर

टीम अॅग्रोवन

लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी झालेल्या कांद्याच्या सौद्यात नव्या हळव्या लाल कांद्याचे दर प्रतिक्विंटलला दहा हजार रुपये, तर जुन्या गरव्या कांद्याचे दर अकरा हजार रुपयांपर्यंत तेजीत निघाले. तर १०० ते १३० रुपये प्रति किलोने कांद्याची किरकोळ विक्री केली जात आहे. 

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर वर्षी दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर हळव्या लाल कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र, यावर्षी सर्वत्रच झालेल्या जोरदार पावसामुळे हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक वाया गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तयार होऊ लागलेला व तयार झालेला कांदा शेतातच नासून गेला. रोपेही नासून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच कांदा पीक सोडले आहे. त्यातून काही वाचलेला कांदा काढून शेतकरी वर्ग सध्या निवडून प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत, तर गरव्या कांद्याच्या लागवडी गेल्या महिनाभरापासून सर्वत्र वेगात सुरू आहेत. 

फलटणच्या पूर्व भागातील दुधेबावी, भाडळे, तसेच माण व खंडाळा तालुक्‍यांतूनही नवीन हळवा लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे, तसेच जुन्या साठवणुकीच्या गरव्या कांद्याचीही तुरळक आवक होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची काहीशी आवक वाढताना दिसत आहे. लोणंद मार्केट यार्डात गुरूवारी झालेल्या कांद्याच्या बाजारात हळव्या कांद्याच्या ७५० पिशव्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली. 

लोणंद बाजारात ऑक्‍टोबर महिन्यापासून कांद्याचे दर तेजीत आहे. गेल्या दोन आठवड्यात तर ७५०० वरून ९१०० रुपयांपर्यंत ही वाढ पोचली. प्रति क्विंटलला उच्चांकी ११ हजार रुपये इतकी भाववाढ झाली आहे.

प्रतवारीनुसार कांद्याचे दर क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे   हळवा लाल कांदा नंबर एक - सात ते दहा हजार रुपये, हळवा कांदा नंबर दोन - ३,५०० ते सात हजार, हळवा कांदा नंबर तीन - एक हजार ते ३,५००, तर जुना साठवणुकीचा गरवा कांदा पाच ते ११ हजार रुपये. दरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून निवडून व चांगला वाळवून बाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT