कांदा
कांदा  
मुख्य बातम्या

तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा

वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम कांदापुरवठ्यावर होत आहे. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा जातो. परंतु येथील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सध्या दिल्लीत कांद्याचे घाऊक दर २३ रुपये या दरम्यान आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.  बाजारात आवक कमी झाल्याने घाऊक दर वाढले आहेत. सध्या दिल्ली आणि परिसरात घाऊक दर २३ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनीही दर वाढवले आहेत. सध्या राजधानीत कांद्याचे किरकोळ दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. त्याचा भार सध्या ग्राहकांवर पडत आहे. आझादपूर बाजारातील कांदा आणि बटाटा व्यापारी संघटनेचे सचिव राजेंद्र शर्मा म्हणाले, की मागील दहा दिवसांत बाजारात कांद्याच्या दरात जवळपास ७ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात सध्या नव्या आणि जुन्या कांद्याच्या दरातील तफावत कमी झाली आहे. तसेच यंदा मॉन्सूनच्या काळात कांदाउत्पादक पट्ट्यातील अनेक भागात उशीर पाऊस झाल्याने लागवडी उशिरा झाल्या. त्यामुळे कांदाकाढणी अजून शेतकऱ्यांनी सुरू केली नाही. परिणामी खरिपातील कांदा अजून बाजारात आला नाही. त्याचा परिणाम आवकेवर झाला असून दरही वाढले आहेत. देशात महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होते.  महाराष्ट्रात उत्पादनाला फटका आशियातील सर्वांत मोठ्या कांदा बाजारात सध्या कांदा आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रात आॅक्टोबर हीट आणि दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे, तसेच नवीन कांदा अजून बाजारात आला नाही, त्यामुळे दर वाढून २१ ते २२ रुपये प्रतिकिलोदरम्यान आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती कायम राहिल्यास कांदा उत्पादनात घट होऊन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजारात मागील वर्षी याच काळात कांद्याचे दर प्रतिकिलो १५ रुपयांदरम्यान होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT