Onion plants
Onion plants 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची कांदा रोपांची शोधाशोध

टीम अॅग्रोवन

नाशिक : कांद्याची आवक घटल्याने दरात असलेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काहींनी पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार केली असली तर रोपे विरळ झाल्याने कांदा लागवडीचे गणित बिघडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक रोपांच्या शोधात थेट शेजारील जिल्ह्यात जात आहेत.  उन्हाळ कांद्याची बाजारात होणारी आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने उन्हाळ कांद्याने नऊ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे कांदा लागवडीला शेतकरी यंदा ही पसंती देत आहेत. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने रोपांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याच्या लागवडीवर परिणाम दिसून येत आहेत. एकंदरीत महिनाभर कांद्याच्या लागवडी पुढे गेल्या आहेत. रोपांचे क्षेत्र अडचणीत आल्याने वाचलेल्या रोपांना भाव आला आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ३३७ हेक्टरवर रोपवाटिका तयार करण्यात आल्या. मात्र रोपे खराब झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर रोपे टाकण्यात आली. त्याचे क्षेत्र ७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर गेले आहे. त्यात कृषी विभागाने नुकसानीचा आकडा ७ हजारांपर्यंत प्राथमिक अंदाजात वर्तविला होती. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर रोपांची टंचाई आहे. एक एकर कांदा रोपांसाठी तीस ते पस्तीस हजारांचा दर सुरू असल्याने शेतकऱ्यांना रास्त भावात रोप मिळण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.  मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर रोपे असताना शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी नसल्याने लागवडी कमी झाल्या. मात्र चालू वर्षी पाणी आहे, मात्र लागवडीसाठी रोपे उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकूणच कांद्याच्या आगारात शेतकऱ्यांना रोपांऐवजी इतर पिकांकडे वळण्याची वेळ आल्याने उन्हाळं कांदा लागवडी उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  इतर जिल्ह्यांमध्ये शोध नाशिक जिल्ह्यात कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर या तालुक्यांत तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व श्रीरामपूर तालुक्यांत रोपांची शोधाशोध सुरू आहे. तर नांदगाव, चांदवड, सिन्नर या भागांत रोपे पाहण्यासाठी वर्दळ दिसून येते. तर नांदगाव, येवल्याच्या उत्तर व चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी विक्रीसाठी रोपे सध्या उपलब्ध असल्याने शेतकरी आगाऊ पैसे देऊन रोपे लागवडीसाठी आरक्षित करत आहेत.  प्रतिक्रिया शेतात असलेल्या रोपाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र आम्हालाच रोपे कमी पडणार असल्याने विक्री न करता लागवड करणार आहे.  - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT