उमराणे बाजार समितीत जानेवारीपासून ‘सेम डे’चा चेक
उमराणे बाजार समितीत जानेवारीपासून ‘सेम डे’चा चेक 
मुख्य बातम्या

उमराणे बाजार समितीत जानेवारीपासून ‘सेम डे’चा चेक

ज्ञानेश उगले

नाशिक : उमराणे बाजार समितीत काही व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभापासून (१ जानेवारीपासून) शेतकऱ्यांना पुढील तारखेचा चेक देणे बंद होणार असून, असा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करून त्याचा व्यापार बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. २०) ‘ॲग्रोवन मध्ये प्रसिद्ध झाले होते.

पुढील तारखेचा चेक देऊन शेतकऱ्यांचे पैसे महिनोंमहिने लटकवण्याचे प्रकार उमराणे बाजार समितीत घडत आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी अडवून ठेवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर यापुढील काळात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही. अशी अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे उमराणे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. बाजार समितीचे ५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक व्यवहारांवर बारीक नजर ठेवणार आहे. एखाद्या व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशीचा चेक जर दिला, तरी त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाणार असल्याचे बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

मार्चपर्यंत ‘आरटीजीएस’ उमराणे ही बाजार समिती ग्रामीण भागात असल्याने इथे ‘एसबीआय’ या राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकच शाखा आहे. तरीही मार्च २०१८ पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘आरटीजीएस द्वारे पैसे जमा होतील, या दृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचेही देवरे यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर अडचणी वाढल्या उमराणे बाजार समितीचे सचिव नितीन जाधव म्हणाले, की नोटाबंदीपूर्वी सर्वाधिक रोख पेमेंट करणारी अशी या बाजार समितीची ओळख राहिली आहे. अचानक झालेल्या नोटाबंदीनंतर बाजाराचे गणितच बिघडले; मात्र समितीच्या संचालकांकडून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बॅंकिंग सेवेचा अडथळा असल्याने तातडीने ‘आरटीजीएस’ शक्‍य नाही; मात्र चेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनाविलंब पेमेंट होणार आहे. व्यापाऱ्यांनीही याबाबत तयारी दाखवली आहे. -राजेंद्र देवरे, सभापती, उमराणे बाजार समिती.

यापुढील काळात व्यवहारात अधिक शिस्त व पारदर्शकता आणण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांनी रीतसर बाजार समिती कार्यालयात तक्रारी कराव्यात. त्यांचा तत्काळ निपटारा केला जाईल. -खंडू देवरे, संचालक- उमराणे बाजार समिती, अध्यक्ष- ओनियन मर्चंट असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT