मुंबई बाजार समितीत शनिवारी एक हजार गाड्यांची आवक
मुंबई बाजार समितीत शनिवारी एक हजार गाड्यांची आवक 
मुख्य बातम्या

मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा लिलाव बंद; शनिवारी १००० गाड्यांची आवक

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू झालेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात शनिवारी (ता.२८) सुमारे एक हजार भाजीपाला गाड्यांची आवक झाली.  लॉकडाऊनमुळे राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्भे येथील भाजी व अन्न धान्य या दोन घाऊक बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी बैठका घेऊन व्यापाऱ्यांना या जीवनावश्यक बाजारपेठा सुरू करण्याचा आग्रह केला.   मुंबईकरांना भाजीपाला पुरवठ्यासाठी बाजार समितीमधील या घाऊक बाजारपेठा २६ मार्चपासून खुल्या केल्या आहेत. बाजारात सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात की नाही, याचा अंदाज घेऊन पुढे बाजार सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बाजार समितीने गुरुवारी सर्व नियम पाळून कशा पद्धतीने आवारात प्रवेश दिला जाईल, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवलेे. व्यापारी व्यवहार बंद ठेवणार... मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.२८) ग्राहक एकमेकांत अंतर न ठेवता गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतकी गर्दी होणे, अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे धास्तावलेल्या भाजीपाला व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या काळात जे व्यापारी व्यवहार सुरू ठेवू इच्छितात त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे.  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीच्या आधारे असे व्यापारी व्यवहार सुरू ठेवू शकतात, असे बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी शंकर पिंगळे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT