बोंडअळी
बोंडअळी  
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात बोंड अळीबाबत एक लाख तक्रार अर्ज

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः गुलाबी बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना तक्रार करण्यासाठी ‘जी’ अर्ज भरून देण्यासाठी येत्या १५ तारखेपर्यंतच मुदत आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यासाठी खर्चही येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यात जवळपास एक लाख शेतकऱ्यांचे अर्ज तालुक्‍याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.  ‘जी’ प्रकारचा अर्ज तलाठी सजा असलेल्या गावातच झेरॉक्‍स केंद्रात पाच ते १० रुपयांना विकत मिळत आहे. हा अर्ज कृषी सहायकांनी आपालल्या कार्यक्षेत्रात वितरित केलेला नसल्याचे चित्र आहे. तर तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन हे अर्ज भरायचे आहेत. तालुक्‍यालाही तालुका कृषी विभागात अर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.  अर्जासोबत सातबारा उतारा, कपाशी बियाणे खरेदीची पावती सक्तीची आहे. धुळे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून, तेथे सुमारे २० हजार अर्ज दाखल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्‍यात १५ हजार ५००, जळगावात १४ हजार, भुसावळमध्ये तीन हजार, रावेरात चार हजार, जामनेरात १६ हजार, पाचोरा येथे सुमारे १२ हजार, अमळनेरात सुमारे १४ हजार, एरंडोलात चार हजार, धरणगावात पाच हजार, चोपड्यात ११ हजार यावलमध्ये नऊ हजार एवढे अर्ज, मुक्ताईनगरात ११ हजार व बोदवडमध्येही सहा हजारांवर अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. 

साडेचार लाख हेक्‍टरवर बोंड अळी जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यातील सुमारे साडेचार लाख हेक्‍टरवरील कपाशीवर गुलाबी बोंड अळी असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने जारी केला आहे. कोरडवाहू कपाशीचे पीक उभे आहे. त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मिळाली. धुळे जिल्ह्यातही साक्री, शिंदखेडा, धुळे, शिरपुरात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. धुळ्यातील दोन लाख हेक्‍टरपैकी ८० टक्के पीक अळीग्रस्त असून, तेथेही उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

शेतकऱ्यांना खर्चच खर्च गुलाबी बोंड अळीने एकीकडे शेतकऱ्यांना फटका बसलेला असला, तरी दुसरीकडे मात्र या अर्जांच्या कटकटीमुळे खर्चही करावा लागत आहे. तालुक्‍याला जाण्या-येण्याचे भाडे, सातबारा उतारा तलाठ्याकडून आणणे, असे हेलपाटे खावे लागत असून, त्यासाठी किमान १०० ते १५० रुपये खर्च लागत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT