कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना शेतकरी
कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना शेतकरी  
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी दीड लाखावर अर्ज

Vinod Ingole

अमरावती : कर्जमाफी योजनेसाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एक लाख ९६ हजार १२८ अर्ज दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.

कुटुंबातील एकालाच योजनेचा लाभ मिळणार असताना अनेक खातेदारांनी नोंदणी केल्याने आकडा फुगल्याची शक्‍यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. अमरावती जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत. २० ते २५ हजार शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठण झाले आहे.

अखेरच्या मुदतीपर्यंत तीन लाख ६० हजार ७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या तुलनेत एक लाख ९६ हजार १२८ शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता.२२) पर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठणापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बहुतांश थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, अद्याप तीस हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज भरणे बाकी असल्याने किमान एक आठवडा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT