मोनोक्रोटोफॉससह पाच कीटकनाशकांवर बंदीच्या मुदतवाढीची शिफारस
मोनोक्रोटोफॉससह पाच कीटकनाशकांवर बंदीच्या मुदतवाढीची शिफारस 
मुख्य बातम्या

मोनोक्रोटोफॉससह पाच कीटकनाशकांवर बंदीच्या मुदतवाढीची शिफारस

Vinod Ingole

अमरावती ः विषबाधेच्या घटनांमध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचे बळी गेल्यानंतर काही सर्वाधिक विषारी असलेल्या कीडनाशकांवर बंदी लादण्यात आली होती. साठ दिवसांनंतर या बंदीची मुदत ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. आता पुन्हा नव्याने ३० दिवसांकरिता बंदी लादण्याची शिफारस कृषी आयुक्‍तालयाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या अधिकारात केवळ ९० दिवस बंदी घालता येते.  यवतमाळ जिल्ह्यात कापाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सर्वाधिक विषारी श्रेणीतील कीडनाशकाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे यातील काही कीडनाशकांची कापाशीसाठी शिफारसच (लेबल क्लेम) नव्हती, अशी बाब चौकशीत पुढे आली. यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधेच्या प्रकरणातील या चौकशीत मोनोक्रोटोफाॅस या अति विषारी कीटकनाशकासह ट्रायझोफॉस व अन्य काही कीटकनाशकांचा वापर झाल्याचे दिसून आले. या माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून कीडनाशके खरेदी केलेल्या पावत्या तपासण्यात आल्या. त्यावरील नोंदीच्या आधारे पाच कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मोनोक्रोटोफॉस कीटकनाशकाचा देखील समावेश आहे.  मोनोक्रोटोफॉससह इतर पाच कीडनाशकांवर यवतमाळमधील घटनेनंतर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ६० दिवस बंदी लादण्यात आली. ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर आता पुन्हा नव्याने बंदीचा प्रस्ताव कृषी आयुक्‍तालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सूत्र सांगतात. राज्याच्या कायद्यात केवळ ९० दिवस बंदीचे अधिकार आहेत. त्यानंतरच्या वाढीव कालावधीकरिता   बंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता लागते. परंतु केंद्र सरकारकडून त्यासाठी मान्यता मिळण्याची प्रक्रिया तेवढी सोपी नाही, असे आधीच्या प्रकरणात सिद्ध झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT