Nutrient balance important for efficient use of fertilizers: Dr. Patil
Nutrient balance important for efficient use of fertilizers: Dr. Patil 
मुख्य बातम्या

खतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन महत्वाचे : डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते. खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी विविध प्रकाराची अन्नद्रव्ये यात मुख्य, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये याचे संतुलन करणे महत्वाचे आहे’’, असा सल्ला कृषि संशोधन केंद्र, निफाडचे मृद शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी दिला. 

मालेगाव केव्हीकेतर्फे रासायनिक खतांचा कार्यक्रम वापर जनजागृती अभियानांतर्गत ''रासायनिक खतांचा संतुलित वापर’ व ‘जमीन आरोग्य व्यवस्थापण'' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.  

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘येणाऱ्या हंगामात खतांचा संतुलित करण्यासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करावा. सुक्ष्म अन्न-द्रव्यांची कमतरता असेल, तर पिकाच्या शिफारशीनुसार जमिनीतून अथवा फवारणीद्वारे वावर करावा.’’ 

मृदा शास्त्र विशेषज्ञ विजय शिंदे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर व वेस्ट डिकम्पजोर वापराचे महत्त्व, या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन बोरदैवत (ता. कळवण) येथे करण्यात आले. वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी ‘माती परीक्षण महत्व व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा कार्यक्षम व संतुलित वापर’ या विषयी मार्गदर्शन केले. 

विषय विशेषज्ञ रुपेश खेडकर यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी पूर्वमशागत, बी-बियाणे, गादी वाफ्यावर टोकण पध्दतीने पेरणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, तणनियंत्रण आदीविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना येत असलेल्या विविध समस्येचे निराकरण तज्ज्ञांनी केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर, नाडेफ पद्धतीने कम्पोस्ट तयार करणे, गांडूळखताचा वापर करण्याचे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT