फवारणी
फवारणी 
मुख्य बातम्या

शेतमजुराच्या विषबाधेप्रकरणी तेजापूरच्या शेतकऱ्याला नोटीस

टीम अॅग्रोवन

वणी, यवतमाळ  : शेतमजुराला फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेला शेतकरी कारणीभूत असल्याप्रकरणी पहिली कारवाई यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे. मजुराच्या जीविताला धोका पोचविल्याचा आरोप करीत तीन दिवसांत याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्याला नोटीसच्या माध्यमातून दिल्याने खळबळ उडाली आहे.  यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी २२ जणांचा, तर राज्यात ४९ शेतकरी, शेतमजुरांचा फवारणीदरम्यान विषबाधेने मृत्यू झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा घटनांतील मृतकांना आता चार लाख रुपयांची मदत दिली जाते. दरम्यान, वाढत्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रणासाठी शासनाने शेतमजुरांच्या विषबाधेला शेतकऱ्याला जबाबदार ठरविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातूनच पहिल्यांदा करण्यात आली आहे. तेजापूर (ता. वणी) येथील अंकुश बंडू भोयर (वय ३०) या शेतमजुराला २१ ऑगस्ट रोजी फवारणीदरम्यान विषबाधा झाली होती. त्याला सुरवातीला वणी येथील रुग्णालयात व नंतर यवतमाळला दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. तहसीलदार रवींद्र जोगी यांनी शेतकरी विजय लक्ष्मण मालेकार (रा. तेजापूर) यांना नोटीस बजावली. फवारणी करते वेळी शेतमजुराला संरक्षण साहित्य (सेफ्टी कीट) पुरविली नाही. त्यासोबतच वापरलेले कीटकनाशक अतिजहाल, प्रतिबंधित किंवा अनधिकृत असण्याचीदेखील शक्‍यता आहे. फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याविषयी ग्रामसभेत व इतर विविध पर्यायांतून प्रशासनाने जागृती केली. त्याचीदेखील दखल संबंधित शेतकऱ्याने घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच कारणामुळे शेतमजुराच्या जीविताला धोका निर्माण झाल्याप्रकरणी जबाबदार धरत संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आल आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता.३०) विजय मालेकार यांना तहसीलदारांसमोर लेखी खुलासा सादर करायचा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT