कांद्यासंबंधी आदेश नसल्याचे  कारण देत पंचनामे लांबणीवर
कांद्यासंबंधी आदेश नसल्याचे कारण देत पंचनामे लांबणीवर 
मुख्य बातम्या

धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश नाहीत

टीम अॅग्रोवन

नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या येवला तालुक्यात उशिराच्या पावसाच्या भिस्तीवर खरीप कांदा लागवडी झाल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. त्यात थोड्याफार लागवडी जगल्या. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागात काढणीला आलेल्या खरीप कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न होता टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.  जिल्ह्याच्या मुख्य पट्ट्यात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होते; परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी लांबणीवर गेल्या. त्यामुळे कांदा काढणी हंगाम लांबणीवर जाणार हे चित्र असताना पावसाने कांदा पीक धोक्यात आले आहे. पावसाचे पाणी कांद्याच्या वाफ्यांमध्ये अजूनही साचून राहिल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणावर कंद सडून गेले आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पादनापासून शेतकरी मुकणार आहे.  येवला तालुक्यातील पूर्व भागात कोळगाव, ममदापूर या गावांमध्ये लाल कांदा अजूनही पाण्यात आहे. मात्र पंचमाने करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचमाने करताना कांदा पीक वगळले आहे. त्यांना याबाबत विचारले असताना पंचनाम्यासाठी मका पिकाचे सांगण्यात आले आहे. मात्र, कांदा पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे कर्मचारी सांगतात. कांदा पंचनाम्यांचे आदेश नाहीत, आम्ही कांद्याचे पंचनामे करणार नाही. यानंतर पंचनामे करण्याची विनंती केल्यानंतर मक्याचे पंचनामे झाल्यानंतर करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अशी माहिती कोळगाव व ममदापूर परिसरातील कांदा उत्पादकांनी दिली. तातडीने पंचनामे करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी या परिसरातील कांदा उत्पादकांनी केली आहे.  मनुष्यबळ कमी असल्याने कामकाजास दिरंगाई  या भागात मका, कापूस, कांदा या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, हे सर्व पंचमाने करताना मर्यादित मनुष्यबळ आहे. त्यामुळे कामकाजात दिरंगाई होत असल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असता सांगण्यात आले. काही पंचमाने जर शिल्लक असतील तर तेही सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT