Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

काही ठिकाणी हलक्या सरी 

टीम अॅग्रोवन

पुणे ः अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागांत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण झाले आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी पुणे, कोल्हापूर व कोकणात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले असून, त्याचा परिणाम रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, फळबागा व भाजीपाला पिकांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच राजस्थानच्या नैर्ऋत्य भागात व परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. 

ढगाळ हवामानामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा तयार झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांतून थंडी कमी झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कमी राहणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात काही अंशी कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांनंतर खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी गारपिटीसह हलक्या सरी पडतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडी गायब झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.  शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअस) ः  मुंबई (सांताक्रूझ) २४ (६), अलिबाग २३.५ (५), ठाणे २३, रत्नागिरी २४.६ (५), डहाणू २१.९ (३), पुणे १८.२ (७), जळगाव १९.५ (८), कोल्हापूर २१.४ (६), महाबळेश्‍वर १६.७ (३), मालेगाव २१.६ (१०), नाशिक २०.१ (९), निफाड १८., सांगली २०.२ (६), सातारा १८.७ (५), सोलापूर १८.५ (३), औरंगाबाद १७.६ (६), बीड १५.१ (२), परभणी १५.३ (२), परभणी कृषी विद्यापीठ १४, नांदेड १६.५ (४), उस्मानाबाद १९.४ (६), अकोला १७.७ (४), अमरावती १७.९ (३), बुलडाणा १८.३ (४), चंद्रपूर १५.४ (२), गोंदिया १३ (२), नागपूर १५.४ (३), वर्धा १५.८ (२), यवतमाळ १८ (३).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT