‘एनएचएम’च्या अर्जासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
‘एनएचएम’च्या अर्जासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ  
मुख्य बातम्या

‘एनएचएम’च्या अर्जासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १९ जून रोजी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच राज्यातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत दहा जुलै या एकाच दिवशी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली.  या योजनेअंतर्गत हरितगृह, शेडनेट, शेततळे अस्तरीकरण, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फुले व भाजीपाला, ट्रँकर, पाॅवर टिलर, शीतगृह, रायपनिग चेंबर, रेफर व्हँन, पीक संरक्षणे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ उभारणी, मधुमक्षिकापालन या घटकाकरिता आँनलाईन अर्ज करता येणार आहे. सामूहिक शेततळे या घटकाकरिता फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. शेतकऱ्यांना या घटकाअंतर्गत सहाशे ते एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता सात बारा उतारा, आठ अ, आधार कार्ड, आधारकार्ड लिक बँक खाते, पासबुक झेराॅक्स, हमीपत्र, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.  अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळकृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोकळे यांनी केले.  योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २० जून ठेवण्यात आली होती. या योजनेस शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी अर्ज करण्याचे शिल्लक असून अर्जासाठी मुदतवाढ करण्याची मागणीचे संदेश येत होते. त्यामुळे दहा दिवस म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  - प्रल्हाद पोकळे, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT