नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव भांड्यात The new permit puts the lives of maize growers at risk
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव भांड्यात The new permit puts the lives of maize growers at risk 
मुख्य बातम्या

नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव भांड्यात 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही सुमारे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका पडून आहे. केंद्र शासनाने भरडधान्य खरेदीस मुदतवाढ दिल्याने आता या मक्याच्या खरेदीचा पेच सुटला आहे. राज्याकडून आदेश मिळताच खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 

जिल्‍ह्यात विदर्भात सर्वाधिक मका उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरिपात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. जिल्ह्यात मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी आजवर ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचा १ लाख ४० हजार ९२४ क्विंटल मका खरेदी झालेला आहे.

खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याचे कारण देत शासनाने मुदतीपूर्वी (३१ डिसेंबर) मका खरेदी थांबविल्याने जिल्ह्यातील राहिलेल्या साडेसात हजारांवर मका उत्पादकांसमोर पेच तयार झाला होता. मका खरेदी सुरू करण्याची मागणी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी या खात्याच्या मंत्र्यांकडे केली होती.

गेले १० ते १२ दिवस या बाबत कुठलीही घोषणा न झाल्याने अनेकांनी खुल्या बाजारात कमी दरात मक्याची विक्री सुरू केली होती. बाजारभाव व आधारभूत किमतीत शेतकऱ्यांना ७०० रुपयांपर्यंत फटका सहन करावा लागला आहे. शासनाचा बाजारभाव १ हजार ८५० असताना बाजारपेठेत १ हजार १०० रुपयांपासून खरेदी सुरू होती.

जिल्ह्यात सध्या दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक असल्याचा अंदाज आहे. नव्या मंजुरीनंतर आता ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत राहणार आहे. यामुळे शिल्लक असलेला मका राहिलेल्या १६ ते १७ दिवसांतच खरेदी करावा लागणार आहे. 

केंद्राने मंजुरी दिल्याने खरेदीचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे आदेश जिल्हा यंत्रणेला मिळताच जिल्ह्यात १५ केंद्रांवर तातडीने मका खरेदी सुरू केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मका खरेदीच्या अनुषंगाने सर्वच तयारी आधीपासून झालेली आहे. 

  • बुलडाण्यातील मका खरेदी 
  • नोंदणी केलेले शेतकरी - ११३३१ 
  • मका खरेदी झालेले शेतकरी- ३७८८ 
  • शिल्लक शेतकरी- ७५४३ 
  • झालेली मका खरेदी- १४०९२४ (क्विंटल)   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

    Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

    Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    SCROLL FOR NEXT