Nashik farmers' slogan of 'No Lockdown'
Nashik farmers' slogan of 'No Lockdown' 
मुख्य बातम्या

नाशिकच्या शेतकऱ्यांचा ‘नो लॉकडाउन’चा नारा

टीम अॅग्रोवन

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनचा इशारा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी भीती दाखवून शेतीमाल कमी दराने खरेदी करत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा लॉकडाउन नकोच, या भूमिकेवर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. त्यास विरोध दर्शवित ‘नो लॉकडाउन’ची मोहीम शेतकऱ्यांसह तरुणाईने हाती घेतली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काहीच दुमत नाही. मात्र लॉकडाउनचा इशारा दिल्याने शेतीमालाच्या विक्रीत अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे सरकारने कडक निर्बंध लावावेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. मात्र लॉकडाउन करू नका असा शेतकऱ्यांचा सूर आहे. अन्यथा, आम्ही अडचणीत येऊ, उद्ध्वस्त होऊ, अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर मांडायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी स्वतःची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. एकीकडे गर्दी नियंत्रित न झाल्यास बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी गोंधळात आहे. त्याअनुषंगाने ‘#शेतकरी_वाचवा’,‘#No_Lockdown’ चा ट्रेंड शेतकऱ्यांकडून समाज माध्यमांवर सुरू झाला आहे. तसेच यापूर्वी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

शेतकरी म्हणतात...

  • मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे दर घरसले.
  • शेतकरी व शेतमजुराचा काय होईल याचा सरकारने विचार करावा?
  • लॉकडाउनमुळे शेतीमालाचे नुकसान होते. नियम कडक करावेत.
  • आता जर घरात बसवलं तर शेतकरी परत कधीच उभे राहू शकणार नाहीत.
  • सरकारने योग्य काळजी घेत आग्रही राहत बाजारपेठ खुली ठेवावी
  • लसीकरणावर जोर देऊ, मास्क घालू, अंतर पाळू, पण लॉकडाउन हा पर्याय नाही.
  • लॉकडाउनचे संकट डोक्यावर घोंघावतेय. अडचणीच्या काळात संकटे सोसून कामकाज केले. आमच्या कष्टाचा कधी विचार होणार? - किरण मोरे, कांदा उत्पादक, ठेंगोडा, ता. सटाणा   लॉकडाउन नंतर शेतीमाल शहरात पोहोचू शकत नाही. याचा दलाल फायदा घेणार. त्यामुळे नुकसान कोण भरून देणार हे सांगावे. - वाल्मीक सांगळे, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT