नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन

नाशिक  : गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झल्यानंतर पुन्हा दिंडोरी व निफाड तालुक्यात पाऊस स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. पिंपळगाव, खेडगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावत द्राक्ष व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी अडचणी वाढवल्या आहेत.  जिल्ह्यात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे द्राक्ष व टोमॅटो पिकांना धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांवर डावणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात आवक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत, लोणवडी, उंबरखेड, सोकारे मिग परिसरात पावसाने सलग दोन तास हजेरी लावली. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. दिंडोरी तालुक्यात चिंचखेड, खेडगाव, जोपूळ, मातेरेवाडी, सोनजांब, गोपेगाव, जऊळके वणी या परिसरातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडले आहेत.  या झालेल्या परिसरात प्रामुख्याने सध्या टोमॅटो व द्राक्ष हंगाम सुरू आहे. त्यामुळे टोमॅटो लागवडीमधील फूलगळ मोठ्या प्रमाणावर झाली. पावसाचे थेंब मोठ्या आकाराचे असल्याने त्याचा परिणाम झाला. तसेच द्राक्ष ज्या नवीन बागा छाटण्या अजून बाकी आहेत. त्या अजून पुढे जाऊन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ज्या पोंगा अवस्थेमध्ये आलेले द्राक्ष बागेत नवीन घड जिरत आहेत. तसेच या बागांवर डाऊनी येण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी वेलींची नवीन आलेली पाणी चिरली आहेत. तसेच काही द्राक्ष उत्पादक बागा फेल काढण्याच्या अवस्थेत मेहनत घेत आहेत. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे दुष्परिणाम दिसून येतील, असे येथील शेतकरी सांगतात.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT