नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध 
मुख्य बातम्या

नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग होण्यासाठी मोजणी सुरू असताना ग्रामस्थांनी मज्जाव केला. हा प्रकल्प गावातून जात असल्याने भूमिहीन होण्याच्या भीतीपोटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेतली.  

आमच्या जमिनी वडिलोपार्जित असून त्या बागायती आहेत. अगोदरच अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. यात रोजगार उपलब्ध नाही. गावात जास्त लोकसंख्या असून दरडोई क्षेत्र कमी आहे. या सर्व बाजू मांडताना भूमिहीन होण्याच्या भीतीपोटी सर्वांनी एकजुटीने ग्रामसभेत विरोध दर्शविला. प्रकल्प मंजूर करतेवेळी तो चेहडी, जाखोरी, शिंदे यामार्गे प्रस्तावित आहे. मात्र या मार्गात नानेगाव, बेलतगव्हाण या गावांचा समावेश कसा करण्यात आला? असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला. या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ''आमचा घास कुणी हिरावून घेतल्यास आम्ही संघर्षासाठी सर्वांपुढे राहू'', असा इशारा महिलांनी दिला.

आत्मदहनाचा इशारा 

प्रकल्प रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला. समस्त गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला. या वेळी नानेगाव ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT